राज्यात करोना रुग्ण संख्या वाढतेय; लॉकडाऊनचा विचार सध्या नाही पण... | आरोग्यमंत्री

  • 2 years ago
राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील काही भागांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी रेट अगदी १० ते ११ टक्क्यांच्या आसपास जाऊन आला आहे. त्यामुळे राज्यभरात निर्बंधाची कठोर अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध वाढवलेही जाऊ शकतात. मात्र, सध्याच्या घडीला राज्य सरकार लॉकडाऊनचा कोणताही विचार करत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनचा परिणाम हा अर्थकारणावर होतो, गरिबांना त्याचा फटका बसतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीवर याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यावेळी तुर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण निर्बंधाची तीव्रता आणखी वाढवली जाऊ शकते, असे संकेत राजेश टोपे यांनी दिले.

Recommended