देशात २४ तासांत १६ ओमायक्रॉनबाधितांची नोंद, त्यातील ११ बाधित महाराष्ट्रात

  • 2 years ago
#OmicroneVariant #NewVariant #OmicronePatients #MaharasjtraTimes
देशातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा भारतातही संसर्ग वाढताना दिसतोय. मंगळवारी देशात 16 नवे ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णाची संख्या 216 इतकी झाली आहे.राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. देशातील एकूण रुग्णापैकी 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या दोन राज्यातील आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या 11 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 65 इतकी झाली आहे.

Recommended