ठाण्यातील वर्तकनगरमध्ये आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 2 years ago
ठाण्यातील वर्तकनगर येथील भीमनगर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आला आहे. परिसरात बिबट्याचे पाच ते सहा ठसे आणि एका श्वानाचा अर्धवट खालेल्या अवस्थेत मृतदेहही आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याआधी बिबट्याचा वावर ठाण्यातील गार्डनमधील सीसीटीव्हीत कैद झाला होता. या बिबट्याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.