Kolhapur l अंतुर्ली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थचे रास्तारोको आंदोलन l Sakal

  • 2 years ago
Kolhapur l अंतुर्ली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थचे रास्तारोको आंदोलन l Sakal

गारगोटी, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील इंदिरा गांधी महिला साखर कारखान्याने स्थापनेपासून ग्रामपंचायतीचा कर भरलेला नाहीय. त्यामुळे अंतुर्लीचे ग्रामस्थ आक्रमक झालेत.. गावकऱ्यांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. तहसीलदार आणि पोलिसांना तसं निवेदनही गावकऱ्यांनी दिलंय. इंदिरा गांधी महिला कारखान्याकडे अंतुर्ली ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा कर थकीत आहे.. उद्या मंगळवारी अंतुर्लीचे गावकरी रास्तारोको आंदोलन करणार आहेत. तर भुदरगड पोलिसांचा उफराटा कारभार पाहायला मिळाला. निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी अंतुर्लीच्या गावकऱ्यांना नोटीस बजावलीय. इंदिरा गांधी सहकारी महिला कारखाना मोठा गाजावाजा करत स्थापन करण्यात आला. मात्र कारखाना स्थापन झाल्यापासून अद्यापर्यंत एकही रुपयाचा करत कारखान्याने ग्रामपंचायत अंतुर्लीला दिलेला नाहीय. सुरुवातीला अध्यक्षा विजयमाला देसाई यांनीही या मागणीकडे दुर्लक्ष केलं. आणि त्यानंतर आतापर्यंत आलेल्या प्रत्येक खासगी कारखाना चालकांनीही अंतुर्ली ग्रामपंचायतीच्या कराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलंय.. आता कारखाना अथनी शुगर्स या कर्नाटकातील खासगी कंपनीच्या ताब्यात आहे. मात्र या कंपनीचंही कारखान्यावर प्रशासन आल्यापासून त्यांनीही ग्रामपंचायतीचा कर देण्यात टोलवाटोलव केलीय. त्यामुळे अंतुर्ली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आता आक्रमक झालेत. ग्रामपंचायतीच्या हक्काच्या करासाठी गावकऱ्यांना आंदोलन करावं लागणं हे दुर्वैवी आहे. तर आतापर्यत प्रशासन दरबारी अनेक फेऱ्या मारूनही कारखान्याने कर भरलेला नाहीय. कारखाना प्रशासन प्रशासकीय अधिकाऱ्यांना मॅनेज करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी आता आरपारची लढई सुरू केलीय.

#KolhapurNewsUpdates #KolhapurLiveUpdates #kolhapur #MarathiNews #maharashtranews #Andolan #Protest #VillageNews #LatestNews #esakal #SakalMediaGroup

Recommended