कल्याण-डोंबिवली महापालिका निर्बंध कठोर करणार; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय
  • 2 years ago
करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रोनने कल्याण-डोंबिवली महापालिकेची चिंता वाढवली आहे. परदेशातून कल्याण-डोंबिवली शहरात आलेल्या प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क होत नसल्यामुळे महापालिकेच्या चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रोन या करोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी मास्क न लावल्यास महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.
Recommended