परळीत दिवाळी कार्यक्रमात सपना चौधरीचे ठुमके; धनंजय मुंडेंवर टीकेची झोड

  • 3 years ago
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून परळीत दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरीने ठुमके लगावले. कार्यक्रमानंतर धनंजय मुंडेंवर टीका होत आहे. शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. एकीकडे राज्यात एसटी कर्मचारी, शेतकरी आत्महत्या यासारखे प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना हे शोभत का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.