संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा

  • 3 years ago
अर्धापूर (जि.नांदेड) : अर्धापूर तहसील कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्यांसाठी बैलगाडी मोर्चा जिल्हाध्यक्ष भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली देगाव ‌येथून काढण्यात आला. हा मोर्चा मालेगाव, कामठा, मेंढला , सांगवी या मार्गाने जात तहसील कार्यालयावर धडकला. ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार मदत देण्यात यावी, पश्चिम महाराष्ट्रात दिलेल्या मदती प्रमाणे मदत देण्यात यावी, दोन वर्षाचा सरसकट मदत द्या, पीकविमा भरपाई साठी उंबरठा पिक उत्पादन पद्धत बंद करावी, शेतीला दिवसा विज पुरवठा करण्यात ‌यावा , शेत मालाला हमीभाव व‌ शेतकरी व‌ शेतमजूरांना दरमाह पांच हजार देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
(व्हिडिओ : लक्ष्मीकांत मुळे, अर्धापूर)

#nanded#farmers demand #bignews