Satara | प्रशासनाच्या दारात.. जागरण, गोंधळ अन्‌ हलगीचा कडकडाट | SakalMedia
  • 3 years ago
Satara | प्रशासनाच्या दारात.. जागरण, गोंधळ अन्‌ हलगीचा कडकडाट | SakalMedia
वडूज (सातारा) : ओबीसी आरक्षण, बाजारबंदी उठवावी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देऊन विविध प्रकारच्या कलाकारांची आयुष्याची होत असलेली फरफट थांबवावी या मागणीसाठी खटाव तालुक्यातील कलाकारांनी थेट प्रशासनाच्या दारातच सुरसनई व शिंग तुतारीच्या निनादाबरोबरच जागरण, गोंधळ, गणगवळण सादर करीत हलगीचा कडकडाट केला. खटाव तालुका सोशल फाऊंडेशनच्यावतीने या सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, डॉ. महेश गुरव, नाना पुजारी, प्रा. कविता म्हेत्रे, धनंजय क्षीरसागर, विजय शिंदे, डॉ. वैभव माने, प्रदिप शेटे, हरीदास जगदाळे, राजेंद्र खाडे, अजित नलवडे, गणेश भोसले, भरत लोकरे, उद्योजक जीवनशेठ पुकळे, अमिन आगा, डॉ. महेश माने, राजेंद्र फडतरे, परेश जाधव, अंकुशराव दबडे, विजय शिंदे, राजेंद्र लोखंडे, पांडूरंग झगडे, बनाजी पाटोळे, गणपतराव खाडे पाटील, अमृत सुर्यवंशी, अजित साठे, शबाना मुल्ला, शारदा भस्मे, दिलशाद तांबोळी, राणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. (व्हिडिओ : आयाज मुल्ला)
#waduj #cultural #Jagrangondhal
Recommended