T-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना बंपर ऑफर

  • 3 years ago
T-20 विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. २४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. टी-२० विश्वचषकातील भारताचा आणि पाकिस्तानचादेखील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे या दिवसाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. २४ ऑक्टोबरला होणारा भारत-पाक सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना चक्क ऑफर देण्यात आली आहे.