भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा द्रविडकडे जाणार असल्याची सूत्रांची माहिती

  • 3 years ago
संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोण येणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. भारताच्या माजी खेळाडूनेच प्रशिक्षकपद स्वीकारावे, अशी ‘बीसीसीआय’ची इच्छा होती. आणि म्हणूनच भारताचा कर्णधार राहिलेल्या राहुल द्रविडच्या नावाची मुख्य प्रशिक्षकपदासाठी गेले कित्येक दिवस चर्चा सुरु होती. आता आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

Recommended