#SayNoToDrugs : आर्यन खानच्या अटकेनंतर सुभाष घई यांची पोस्ट व्हायरल

  • 3 years ago
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अमली पदार्थ बाळगल्या संदर्भात ताब्यात घेतले. दरम्यान चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी अमली पदार्थविरोधी मोहिमेत सहभागी झालेल्या लोकप्रिय कलाकारांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शुभाष घई यांनी ‘कू’ या अॅपवर एक जुना फोटो शेअर केला आहे. यात अभिनेता आमिर खान, अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती अभिनेत्री शबाना आझमी, डिंपल कपाडिया यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज आहेत.

Recommended