मेगाभरतीनंतर भाजपला लागणार का गळती? Mega Bharti | Maharashtra News

  • 3 years ago
एकीकडे प्रचंड उत्साह तर दुसरीकडे निराशा, एकिकडे आनंद तर दुसरीकडे नाराजी... अशी अवस्था झाली आहे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची. पार्टी विथ डिफरन्स अशी भाजपची ओळख आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी झालीय का असा प्रश्न पडतो. २०१९ मध्ये राज्यात सत्ता गेल्यानंतर भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढलेली दिसून आली. काहींनी अप्रत्यक्ष तर काहींनी थेट आपली नाराजी बोलून दाखवली. एकनाथ खडसेंनी काही दिवसांपुर्वी भाजप सोडलं... मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार ज्या भाजपच्या मानल्या जात होत्या त्यांनीही शिवबंधन हातावर बांधलं.. आता पदवीधर निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने माजी केंद्रीय मंत्री जयसिंहराव गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. "मोदीच्या नावावर जोगवा मागणे आणि जगणे, एवढाच धंदा यांना उरलाय" अशी टीका त्यांनी पक्ष सोडताना केली. जयसिंगराव गायकवाड हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जवळचे सहकारी मानले जातात. संघाचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी मराठवड्यात मोठं कामही केलं आहे. गायकवाड हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे.

#lokmat #Maharashtranews #BJP #NCP #Shivsena #Mahavikasaghadi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended