तिवरे धरणफुटीग्रस्तांना सरकारने फसवले | कधी मिळणार न्याय? Tiware Dam Breach | Chiplun | Konkan News

  • 3 years ago
मागच्या वर्षी २ जुलैची काळरात्र आठवतेय. एक धरण फुटलं होतं. उंदीरांमुळे धरण फुटलं होतं असं विधान एका नेत्यानी केलं होतं. तेच चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुटून २२ जणांचा जीव गेल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. मागच्याच वर्षी २ जुलैला रात्री ९.३० च्या सुमाराला हे धरण फुटलं होतं. २२ जण तर गेलेच, त्यातील दीड वर्षांची चिमुकली पूर्वा रणजित चव्हाण ही शेवटपर्यंत हाती लागली नाही. उरलेल्या २१ जणांचे मृतदेह सापडले होते. त्यामध्ये तिवरे - भेंदवाडीतील १८ जण तर पोफळी येथून मासे पकडण्यासाठी आलेले चौघेजण होते. या दुर्घटनेत १७ घरे व १३ गोठे वाहून गेले. त्यामुळे ४६ जनावरांचाही नाहक बळी गेला. आजही या गावातले नागरिक त्या धक्यातून सावरलेले नाहीत. सरकारनी नेहमीप्रमाणे आश्वासनं दिली, पण त्यातली कोणतीही पूर्ण केली नाहीत. मृतांच्या नातेवाईकांना एकूण ६ लाखाची मदत मिळाली. तातडीची रक्कम म्हणून १० हजार रूपयेही मिळाले होते. पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रूपये देण्याची घोषणा हवेत विरली आहे. या धरणफुटीनंतर गावकऱ्यांना कोणत्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या याबाबत आमचे चिपळूणचे प्रतिनिधी संदीप बांद्रे यांनी एक विशेष रिपोर्ट केलाय. गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी तिवरेचे माजी सरपंच तानाजी चव्हाण यांची मुलाखत घेतली.
#lokmat #Konkannews #Chiplun #tiwaredam #Devendrafadnvis #CMUddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended