हिंम्मत असेल तर अटक करून दाखवा | Arnab Goswami Arrest Case | Paramvir Singh | India News

  • 3 years ago
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी रिपब्लीक टीव्ही देखील टीआरपी घोटाळ्यात सहभागी होता, असं जाहीर करताच एकच खळबळ माजली. टाईम्स नाऊ आणि रिपब्लीक टीव्ही यांच्यातल्या गळेकापू व्यावसायीक स्पर्धेतून मग टाईम्स नाऊ आणि ईतर वाहिन्यांनी रिपब्लीक चॅनलवर आगपाखड सुरू केली. पत्रकार परिषदेत रिपब्लीक टीव्हीचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यांनी पत्रकार परिषदही दाखवली नाही. पत्रकार परिषद झाल्यानंतरही त्याची बातमी रिपब्लीकवर दाखवण्यात आली नाही. त्यामुळे खरंच रिपब्लीकचा या घोटाळ्यात समावेश होता का, अशी शंका निर्माण झाली. मात्र अपेक्षेनुसार अर्णब गोस्वामी त्यांच्या चॅनलवर दिसले आणि त्यांनी परमबीर सिंग, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपल्या अधिकृत निवेदनात अर्णब गोस्वामी यांनी आपण परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत. बार्कने त्यांच्या तक्रारीत रिपब्लीक या नावाचा कुठेही उल्लेख केला नाही. त्यामुळे आपण त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू, असं गोस्वामी यांनी त्यांच्या चॅनलवर म्हटलंय.
#lokmat #ArnabGoswami #ParamvirSingh #Sharadpawar #Uddhavthackeray #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended