राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर| Rupali chakankar New women president | Pune | Ncp

  • 3 years ago
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काल (26 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पुण्यात याबाबतची घोषणा केली आहे. रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रसाद लाड यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनीही नुकतंच आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांच्यासह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजप प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended