Lokmat Bollywood Update | प्रियांकाचे 9 पासून वाईन पर्यंतचे काम, आणि काचेचा ग्लास | Priyanka Chopra

  • 3 years ago
प्रियांका चोप्राने स्‍वत:च एक व्‍हिडिओ क्‍लिप इन्‍स्‍टावर अपलोड केली आहे. या व्‍हिडिओत प्रियांका एका काचेच्‍या ग्‍लासमधून वाईन पिताना दिसत आहे. वाईन संपल्‍यानंतर ती हातातला काचेचा ग्‍लास स्‍वत:च्‍या डोक्‍यावर फोडते. तिने व्‍हिडिओ सोबत एक मॅसेजही लिहिला आहे. 'जेव्‍हा तुम्‍ही नाईन पासून वाईनपर्यंत काम करता. कामाचा दिवस वाईट गेल्‍यानंतर मी हा निर्णय घेतला.हे तुम्‍ही घरात ट्राय करू नका,' असे तिनं म्‍हटलं आहे. तसं म्‍हटलं तर हा ब्रेकअवे ग्लास आहे. ज्‍याला शुगर ग्लास असेही म्‍हटलं जातं. या काचेमुळे दुखापत होण्‍याची शक्‍यता कमी असते. या काचेचा उपयोग नेहमी चित्रपटांत केला जातो. दरम्‍यान, प्रियांका चोप्रा बऱ्याच कालावधी पासून घरापासून दूर असून ती न्यूयॉर्कमध्‍ये शूटिंग करत आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended