Lokmat Viral World | AIR इंडियाची पहिली फ्लाईट, आणि ढोल ताशांचा कल्ला | Lokmat Marathi News Update
  • 3 years ago
८ वर्षांनंतर एअर इंडियाने अमृतसर आणि बर्मिंघमसाठी नॉन स्टॉप फ्लाईट सुरू केली.इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा फ्लाईट टेक ऑफ साठी सज्ज झाली. यामुळे प्रवाशांना मस्त सरप्राईज मिळाले. सीटवर पंजाबी वेशभूषेत ढोल घेऊन लोक बसले होते. पंजाबी गाणे सुरू होताच ढोल वाजवायला सुरूवात झाली. हे सरप्राईज पाहुन लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. टाळ्या वाजवून लोकांनी कलाकारांना प्रोत्साहन दिले. यावेळी या कलाप्रदर्शनाचे प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डींग करण्यात आले. ढोल ब्लास्टर्स या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ बुधवारी पोस्ट करण्यात आला.पंजाब ते युके असा थेट प्रवास करणारी ही एकच फ्लाईट आहे. ही फ्लाईट आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि गुरूवारी उड्डाण करेल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended