Lokmat Crime | शिर्डीत गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा | विमानतळाची जगा दाखवून फसवणूक | Lokmat News
  • 3 years ago
शिर्डी विमानतळा शेजारील जागा विकणे आहे’, ‘स्वस्त दरात प्लॉट विकत घेता येणार’ अशा जाहिराती देऊन गुंतवणूकदारांना आकर्षित केलं जातं. त्यामुळे असा जाहिरातील किंवा फलक पाहून तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण, असंच आमिष दखवून नाशिकच्या उमेश पोतदार यांची फसवणूक झाली आहे.नाशकातल्या एका एजंटने त्यांना विमानतळाशेजारील जमिनीचे प्लॉट विकले. पोतदारांनी २०१३-१४ साली साडेतीन लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली. मात्र 4 वर्ष उलटून गेली, तरीही जमीन ताब्यात मिळाली नाही. उलट एक धक्कादायक तथ्य समोर आलं. ती जमीन विमान तळाच्या मालकीची निघाली. फसवणूक झालेले पोतदार हे एकटेच नाहीत. नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा भामट्यांना अटक केली आहे. शिवाय समोर येऊन तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended