Cyber Crime News | सापडली देश विरोधी हेरगिरी करणारी पाकड्यांची टोळी | Lokmat News

  • 3 years ago
पाकिस्तान भारताला त्रास देण्यासाठी काहीही करायला तयार असतो..त्यासाठी त्याला कितीही किंमत मोजावी लागेली तरी त्याला चालते. आंध्र प्रदेश पोलिसां नी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईत ही टोळी एक Voip (voice internet protocol) एक्सचेंज चालवत असल्याचं उघड झालं असून, या टोळीकडून अनेक कंपन्यांचे सिमकार्ड आणि डिव्हायस जप्त केले आहेत.काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील मिलिट्री इंटेलिजेंसच्या एका यूनिटला या एक्सचेंजचा सुगावा लागला होता. या एक्सचेंज च्या माध्यमातून, लष्कराची माहिती मिळवण्यासाठी विविध नंबरवरुन कॉल केले जात होते.लष्कराच्या सूचनेनंतर पोलिसांनी छापेमारी केली. या छापे मारीत पोलिसांनी 6 Simbox, बेकायदेशीर पणे मिळवलेले 230 सिमकार्ड आणि लॅपटॉप जप्त केली आहेत.या बॉक्सच्या माध्यमातून परदेशात बसलेली व्यक्ती आपला मोबाईल नंबर जाहीर न करता, भारतात कॉल करु शकते. हा कॉलदरम्यान ज्याला फोन केला आहे, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर तो नंबर भारतीयच असल्याचं दिसते. त्यामुळे कॉल करणारा व्यक्ती परदेशातून फोन करत आहे, हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended