Lokmat News Update | जगबुडी नदीपात्रातील गाळाने घेतला मगरीचा बळी | Lokmat Marathi News

  • 3 years ago
खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीपात्रात मृत अवस्थेत मगर आढळून आल्याने जगबुडी नदीपात्रातील प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात मृत झालेली महाकाय मगर महतप्रयासाने बाहेर काढण्यात आली.खेड शहरातील सर्पमित्र ओंकार चिखले हे जगबुडी पुलावरुन जात असताना त्यांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधी जाणवली. ही दुर्गंधी नेमकी कशाची असावी याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता त्यांना नदी पात्रातील गाळामध्ये मगर मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना पाचारण करण्यात आले. गाळाने भरलेले नदीपात्र आणि अन्य मगरींची दहशत यामुळे मृत मगरीपर्यंत जाण्यासाठी कोणीही तयार होत नव्हता. अखेर एका युवकांने पाण्यात उतरून पाण्यावर तरंगणाऱ्या मृत मगरीच्या पोटाखाली लाकडी फळी टाकून या युवकाने मगरीला नदीपात्राबाहेर आणले. त्यानंतर त्या मगरीचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दफन केले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended