मृत्युरुपी यमाला परतवण्यासाठी चक्क ती धावून आली | Lokmat News Update | Lokmat Marathi News
  • 3 years ago
नांदेड तपोवन एक्स्प्रेसने २० वर्षीय तरूण दीपक बालासिंग मनावत हा दरवाजात बसून प्रवास करत होता. लासूर – रोटेगाव दरम्यान असलेल्या करंजगाव रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर त्याचा तोल जाऊन खाली कोसळला. महिलेने तातडीने रेल्वे थांबविण्यासाठी साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळे रेल्वे बरीच पुढे जावून थांबली. महिला प्रवाशाने खाली उतरून तपोवन एक्स्प्रेसच्या गार्डला ‘प्रवासी खाली पडला आहे, गाडी मागे घ्या’, अशी विनंती केली. त्यावेळी आरपीएफ च्या जवानाने ‘प्रवासी पडलाच नाही’, असे म्हणत महिलेवर ओरडले संतप्त झालेल्या महिलेने ‘आरपीएफ’ला गाडी पाठीमागे घेता की नाही? असे म्हणत दम दिला. त्यावेळी गार्डने दोन ते तीन कि.मी.पर्यंत तपोवन एक्स्प्रेस मागे घेतली आणि जखमी पडलेल्या तरुण दिसताच त्याला उपचारासाठी गार्डच्या डब्यात ठेवण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या तरुणाला घेऊन तपोवन एक्स्प्रेस संभाजीनगरच्या दिशेने निघाली. दरम्यान या घटनेची माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने रेल्वे स्टेशनवर धाव घेऊन रुग्णवाहिकेला कळवले.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended