Lokmat News Update | आजच्या आधुनिक जगात मुलांना मातृभाषा वाचतानाही अडचण | Lokmat Marathi News

  • 3 years ago
‘अॅन्युअल स्टेटस् ऑफ एज्युकेशन रिपोर्ट मध्ये 14 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना अनेक मूलभूत गोष्टीदेखील नीटपणे उमगत नसल्याचे समोर आले आहे. पाहणीत करण्यात आलेल्या या गटातील 25 टक्के मुलांना आपल्या मातृभाषेत नीटपणे वाचतादेखील येत नाही, तर अनेकांचे गणित, सामान्य ज्ञानदेखील खूप कच्चे आहे.सक्रियता, क्षमता, जन जागृती आणि आकांक्षा अशा चार भागांमध्ये प्रश्‍न विचारण्यात आले. त्यात अनेकांना तास, मिनिटे आणि सेकंदातील वेळही नीटपणे सांगता आली नाही. 76 टक्के मुलांना पैसे नीट मोजता आले नाहीत. 86 टक्के मुलांनी भारताचा नकाशा अचूकपणे ओळखला असला, तरी 64 टक्के युवकांना देशाच्या राजधानीचे नाव सांगता आले नाही. आपण कोणत्या राज्यात राहतो, हेदेखील 79 टक्के जणांना माहिती नव्हते. 42 टक्के जणांना आपल्या राज्याचा नकाशा ओळखता आला नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended