हा खेळाडू नक्कीच सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून घेईल सौरव गांगुली चं प्रतिपादन | Lokmat News

  • 3 years ago
राजस्थान च्या बाडमेरमध्ये राहणारा कमलेश नागरकोटी अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या पहिल्याच मॅचमुळे चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मॅचमध्ये नागरकोटीनं १४९-१५० किमी प्रती तासाच्या वेगाने गोलंदाजी केली.नोएडाच्या शिवम मावीनंही त्याच्या जलद बॉलिंगमुळे लक्ष वेधून घेतलं. शिवम मावीनं जवळपास १४५ किमी प्रती तासाच्या वेगानं बॉलिंग करून ऑस्ट्रेलियाला तगडं आव्हान दिलं. मावीनं सगळ्यात जलद बॉल १४६ किमी प्रती तासानं टाकला.कमलेश नागरकोटी आणि शिवम मावीची ही भेदक बॉलिंग बघून सौरव गांगुली कमालीचा खुश झाला आहे. तसंच विराट कोहली आणि बीसीसीआयनं या खेळाडूं कडे लक्ष द्यावं, असा सल्ला गांगुलीनं दिला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनंही या दोन्ही जलद गोलंदाजांचं कौतुक केलं आहे. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews