स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक जिंका, पाकिस्तानचा Narendra Modi वर हल्लाबोल | Lokmat News

  • 3 years ago
गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांवर आरोप करताना पाकिस्तान चा हस्तक्षेप होत असल्याचे धक्कादायक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याला पाकिस्तानने कडाडून विरोध केला असून ‘भारताने त्यांच्या निवडणुकी च्या राजकारणात आम्हाला आणण्याचे उद्योग बंद करुन स्वत:च्या हिंमतीवर निवडणूक लढवावी,’ असे पाकिस्तानने म्हटले आहे.
हिंदुस्थानकडून होत असलेले आरोप अत्यंत बेजबाबदार आणि निराधार असल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. मोदींनी प्रचारसभे दरम्यान, पाकिस्तानचे नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. अखेर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ट्विटवरून आपली भूमिका स्पष्ट केली. ‘आपल्या निवडणुकीच्या राजकारणात पाकिस्तानला आणणे हिंदुस्थानने थांबवावे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews