Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/13/2021
महाराष्ट्र कन्या कश्‍मिरा पवार आता पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सल्लागार बनली आहे.  विशेष म्हणजे एमपीएससी परीक्षेतलं यश, तसेच 'सीबीआय'मधील अधीक्षक पदी निवड अशा चांगल्या संधी नाकारत, कश्मिराने आव्हानपूर्ण संधी स्वीकारली आहे.तेच तेच, न करता काही तरी आव्हानात्मक करण्यासाठी,या २४ वर्षाच्या युवतीने मेक इन इंडिया, ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत आपल्या कामगिरीची चुणूक दाखवून दिली आहे. याचीच दखल घेतल्याने यापुढे ती ,आता विविध क्षेत्रांतील योजनां बाबत केंद्र सरकारला सल्ला देणार आहे.  केंद्र सरकारच्या वतीने विविध क्षेत्रांतील विकासासाठी, काही प्रकल्पांच्या स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत कश्‍मिराने भाग घेतला, आणि यश मिळवले.
विशेष म्हणजे कश्मिराची, एमपीएससी'मधून तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नुकतीच निवडही झाली आहे आणि पंतप्रधान कार्यालयातून राष्ट्रीय सल्लागार म्हणूनही. तर दुसरीकडे ग्रामीण विकासाच्या प्रकल्पातून तिने सुचविलेल्या "स्मार्ट व्हिलेज'ची योजना उत्तर प्रदेशात राबविण्यास सुरवात झाली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended