प्रदीप कुमारच्या जिद्दीला नाशिक करांचा सलाम, अपंगत्वावर मात करत भारतभ्रमण

  • 3 years ago
अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे तर परिस्थितीने जीवनाचा संघर्ष  करण्यासाठी दिलेले एक लक्षण आहे याचा प्रत्यय प्रदीप कुमार सेन यांच्या कर्तुत्वातून दिसून येतो. याचे आगमन नाशिक शहरात झाले.इंदोर मध्यप्रदेश येथून सायकलवर 1200 किमी अंतर कापत तो नाशिक शहरामध्ये आला होता.
रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यानंतर त्याने स्वच्छ भारत, अपंग कल्याण, पर्यावरण संतुलन या विषयावर जनजागृतीसाठी अखंड भारत भ्रमण करण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे त्याला एक पाय नसून कृत्रिम पायाच्या आधारे तो सायकल चालवतो.यावेळी राजस्थान सेन समाजाच्या वतीने त्याचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपण ध्येयपूर्ती साठी संघर्ष  केला पाहिजे. यातच जीवनाचा खरा आनंद आहे, असा सल्लाही तो आजच्या युवापिढीला देतो.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended