अमिताभ, सुभाषचंद्र बोस, आणि लालबहादूर शास्त्री हे एकाच कुटुंबातील सदस्य? | Lokmat News
  • 3 years ago
अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादूर शास्त्री एकाच कुटुंबातील असल्याचा दावा एका संशोधनातून करण्यात आला आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जया भादुरी यांच्याशी विवाह केला. त्या बंगालच्या असल्याने अमिताभ बंगालचे जावई आहेत. तर 1939 मध्ये मूळच्या बंगालच्या असणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदावर फेरनिवड होण्यात उत्तर प्रदेशने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस यांचा संबंध असू शकतो, असा दावा जागतिक संधोधकांच्या एका टीमने केला आहे.
अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादूर शास्त्री एकाच कुटुंबातील असू शकतात. या दिग्गजांचे मूळ एकच असू शकते.‘उत्तर भारतातील कनौज येथील पाच कुलीन कायस्थ हजारो वर्षांपूर्वी बंगालमध्ये स्थलांतरित झाले. हे लोक त्यानंतर घोष, मित्रा, दत्ता, गुहा आणि बोस या नावांनी ओळखले जाऊ लागले. या पाच कुलीन कायस्थांसोबतच पाच ब्राह्मणदेखील बंगालमध्ये स्थिरस्थावर झाले. ते मुखर्जी आणि बॅनर्जी नावांनी ओळखले जाऊ लागले.
बंगालचे बोस आणि उत्तर प्रदेश चे श्रीवास्तव एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळेच अमिताभ बच्चन, सुभाषचंद्र बोस आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यामध्ये लांबचे नाते असू शकते,’ असा दावा करण्यात आला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended