परप्रांतीय भटका कुत्रा, संजय निरुपम यांच्या घराबाहेर मनसेचं वादग्रस्त होर्डिंग.

  • 3 years ago
फेरीवाल्यांची बाजू घेत मनसेशी दोन हात करण्याची भाषा करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांना पुन्हा एकदा मनसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईतील काँग्रेस मुख्यालयाची तोडफोड करून शुक्रवारी सकाळीच मनसेने निरूपम यांना ‘इट का जवाब पथ्थर से मिलेगा’ असा इशारा दिला होता. त्यानंतर निरूपम यांनी ट्विटरवरून हल्ल्याचा निषेध करत मनसैनिकांना भ्याड, नपूंसक आणि लुख्खे म्हटले होते. या सगळ्या प्रकाराला शुक्रवारी मध्यरात्री मनसेने निरूपम यांना पुन्हा इंगा दाखवला. वांद्रे येथील काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री शाईफेक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली. मात्र, हे कृत्य नेमके कुणी केले, याचा शोध अजूनही लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांकडून कुणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मनसेनेही अजून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. परंतु, गेल्या काही दिवसांतील एकंदरच घटनाक्रम पाहता हा शाईहल्ला मनसेच्याच कार्यकर्त्यांनी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, संजय निरूपम यांच्या निवासस्थानाबाहेरही मनसेकडून वादग्रस्त पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टर्सवर निरूपम यांच्यावर टीका करण्यात आली आहे.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended