पोलिसांनी नाट्यमयरित्या तिला ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं | Australia Latest Update

  • 3 years ago
ट्रेन खाली येण्यापासून नाट्यमयरित्या बचावलेल्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ ऑस्ट्रेलिया मधल्या एका स्टेशनवरचा आहे. ही महिला मद्यप्राशन करून रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. पण नशेमुळे तिला स्वत:चा तोल सावरता येत नव्हता, ना तिला प्लॅटफॉर्मवर चढता येत होतं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.रुळ ओलांडण्याच्या नादात ही महिला ट्रेनखाली येणार होती. वेगात येणाऱ्या ट्रेनची धडक तिला बसणार एवढ्यात पोलिसांनी धावत येऊन नाट्यमयरित्या तिची सुटका केली. नशीब बलवत्तर होतं म्हणून ती फक्त काही सेकंदाच्या फरकानं वाचली. या महिलेला रेल्वेरुळावरून प्लॅटफॉर्मवर खेचण्यात पोलिसांना अडचण येत होती. ऐनवेळी दोन-तीन पोलीस तिच्या मदतीला धावून आले आणि तिला प्लॅटफॉर्मवर खेचून आणलं, म्हणून ती वाचली. पोलिसांचे प्रयत्न जराही कमी पडले असते तर मोठा अपघात घडला असता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended