तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशिममध्ये राबवण्यात आलं स्वच्छता अभियान
  • 3 years ago
गावाच्या स्वच्छतेसाठी महिला सरसावल्या! लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम): राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रमानिमित्त १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता इंझोरी गावामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये गावाच्या स्वच्छतेसाठी महिला सरसावलेल्या दिसून आल्यात.   गावामधून बसथांब्यापासुन तर गावातील मुख्य रस्त्याव्दारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजासह, गाडगे महाराज , भारत माताच्या गजरानाने संपूर्ण गाव दुमदुमुन गेलेत. संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. यावेळी स्वत: महिलांनी पुढाकार घेवून  गाव स्वच्छतेचा विडा उचलला आहे.
Recommended