माणसाचे आयुष्य यु आकाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जात असते | Lokmat Marathi News

  • 3 years ago
माणसाचे आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यांतून जात असते . कधी सुख तर कधी दुखः हे आयुष्याचे अविभाज्यघटक आहेत. दुखः शिवाय सुखाची किंमत कळत नाही. आपण लहानपणापासून नेहमी आनंदी व सुखी राहण्यासाठी धडपडत असतो. परंतु आपल्या जीवनातील काही काळ असा असतो जेव्हा आपण अनेक प्रयत्न करून सुद्धा कमी आनंदी असतो हे अलीकडेच 160 देशात वर्ल्ड वाईड वेल बिईंग या जागतिक स्तरावरील संस्थेने केलेल्या अध्ययनात आढळले. आयुष्यातील 45 ते 54 या वयामध्ये माणसाचे जीवन सर्वात कमी समाधानी आणि आनंदी असते. आयुष्यातील या मध्यम वयातील टप्प्यानंतर जीवन पुन्ह अधिक सुखी आणि आनंदी होण्यास सुरवात होते. हा यु आकाराचा सुखी आणि समाधानी जीवनाचा
आलेख प्रगत आणि श्रीमंत देशांत ठळकपणे दिसला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended