हिंदू मुस्लिम नावे वगळावीत ...विद्यापीठाच्या नावाचा विवाद | लोकमत मराठी न्यूज़

  • 3 years ago
हिंदू मुस्लिम नावे वगळावीत ...विद्यापीठाच्या नावाचा विवाद.

आपल्या देशात हिंदू अन मुस्लिम ह्या दोन्ही धर्मात सतत वाद असतोच अन त्यातून आता
केंद्रीय विद्यापीठांचे परीक्षण (ऑडिट) करणा-या सरकारी समितीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या नावात बदल सूचवला आहे. या दोन्ही विद्यापीठांची निधर्मिवादी प्रतिमा जपण्यासाठी त्यांच्या नावातून अनुक्रमे ‘मुस्लिम’ व ‘हिंदू’ शब्द वगळावेत, असे या समितीने म्हटले आहे.
केंद्रीय मनुष्य बळ खात्या कडून यासंदर्भातील आदेश देण्यात आले होते. यापैकी एका समितीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठाच्या नावात बदल करावे, असे अहवालात नमूद केले आहे. समितीने अलिगढ विद्यापीठाच्या नावातील मुस्लिम शब्द वगळण्याची सूचना केली. या विद्यापीठाचे केवळ अलिगढ विद्यापीठ किंवा सर सय्यद अहमद खान ठेवावे, असे समितीने म्हटले. तर बनारस हिंदू विद्यापीठाच्याबाबतही समितीने असाच अभिप्राय नोंदवला आहे.
महाराष्ट्रा मध्ये नामांतरण वाद सुरु असताच ह्या दोन्ही विद्यापीठाच्या नावात बदल सुचवलेला आहे..हे वाद बघून असे नाही वाटत कि "नाम मे क्या रखा है. "

Recommended