चेहरा काय बदला ! याचं तर नशिबच फिरलं | लोकमत मराठी न्यूज़ | Lokmat Marathi News
  • 3 years ago
चायना नागरिक सारख्या दिसणाऱ्या चेहऱ्यामुळे अनेकदा ठरताना विनोदाचे मानकरी ठरताना दिसतात. स्मार्त फोन मधील Face Detect च्या फिचर सांगताना अनेकांनी यांच्यावर विनोद, मेमेस बनवले होते. एकसारखे दिसण्यामुळे यांच्यातील फरक ओळखण जरा कठीणच जाते !
पासपोर्टवरच्या फोटोशी चेहरा मिळता जुळता नसल्याने चीनमधल्या तीन महिलांना कोरियन अधिकाऱ्यांनी विमानतळावरच रोखून धरलं. सुजलेला चेहरा आणि त्यावर पट्टी बांधलेल्या या महिलांचे फोटो सध्या पाहायला मिळत आहे. या तिन्ही महिलांनी प्लॅस्टिक सर्जरी केली होती. सध्या चीनमध्ये ‘गोल्डन वीक’ सुरू आहे. या काळात चीनमध्ये सार्वजनिक सुट्टी असते. लाखो लोक सुट्टीवर असतात, त्यामुळे सुट्ट्या व्यतित करण्यासाठी त्यांना चीनमध्ये यायचे होते, पण यावर पूर्णपणे पाणी फेरले. कारण प्लॅस्टिक सर्जरीमुळे त्यांचा चेहरा इतका बदलला होता की पासपोर्टवरचा फोटो आणि प्रत्यक्षात खूपच अंतर होतं. त्यामुळे दक्षिण कोरियाच्या इमिग्रंट अधिकाऱ्यांनी त्यांना विमानतळावरच रोखून धरलं. पासपोर्टवर असणारी व्यक्ती आपणच आहोत हे सिद्ध करण्यासाठी या तिघींनीही खूप प्रयत्न केले. या महिलांची मुक्तता कधी झाली हे समजू शकलं नाही. प्लॅस्टिक सर्जरीसाठी दक्षिण कोरियाला चिनी महिलांची विशेष प्रसिद्धी असते. प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी हा देश ओळखला जातो. प्लॅस्टिक सर्जरी करून झाल्यानंतर महिलांना विशेष ऑफरही देण्यात येते, त्यामुळे दरवर्षी हजारो महिला प्लॅस्टिक सर्जरीसाठी या देशात जातात.
Recommended