बाप्पा निघाले कोकणात

  • 3 years ago
चाकरमान्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागला आहे. मुंबईतील गणेशमूर्तीही ट्रेनमार्गे कोकणात दाखल होऊ लागल्या आहेत. रविवारी ( 13 ऑगस्ट ) कोकणात जाणा-या दादर-रत्नागिरी पॅसेंजर या ट्रेनमधून चाकरमान्यांनी आपल्यासोबत गणपती बाप्पालाही नेले. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया' असा एकच गजर सुरू होता.