Pune PMC: पुण्यात कोट्यवधीचे वाहनतळ धूळखात पडून | Parking | J M Road | E-toilet | Sakal Media
  • 3 years ago
Pune PMC: पुण्यात कोट्यवधीचे वाहनतळ धूळखात पडून | Parking | J M Road | E-toilet | Sakal Media
पुणे (Pune) : महापालिकेच्या (PMC)हाकेच्या अंतरावर जंगली महाराज रस्त्यावर(J.M.Road) छत्रपती संभाजीराजे उद्यान शेजारी महापालिकेने (Municipal corporation)कोट्यवधी रुपये खर्च करून यांत्रिक वाहनतळ (पार्किंग) (Parking) उभे केले.मात्र या वाहनतळाची अवस्था असून नसल्यासारखी झाली आहे. मागील एक वर्षापासून वाहनतळ बंद असून या ठिकाणी उघड्यावर राहणारे रहिवासी या वाहनतळाचे लोखंड, पत्रे, केबल चोरी करून त्याची विक्री करून नशाबाजी करतात. वाहनतळासमोर असलेल्या मोकळ्या जागेत गाड्या थांबवण्यासाठी (पार्किंगसाठी) येथे रस्त्यावर राहणारे नागरिक गाडी चालकांकडून अनाधिकृत पैसे घेतात. यासह लाखों रुपये खर्च करून शौचालय ( ई-टॉयलेट) २०१८मध्ये सुरू केले होते, त्याची देखील दुरवस्था झाली आहे. शौचालयच्या शेजारी चूल मांडून उघड्यावर स्वयंपाक केला जातो. याच ठिकाणी मद्यपान केले जाते. त्यामुळे येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. (व्हिडिओ-समाधान काटे)
#Pune #PMC #Parking #JMRoad #Etoilet
Recommended