Mumbai Bomblast Update | मुंबईत बॉम्ब ठेवल्याच्या फोननंतर आता दोघं ताब्यात
  • 3 years ago
मुंबईत लोकल स्थानकांवर आणि अमिताभ(Amitabh Bacchan) यांच्या बंगल्यात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी मुंबई पोलिस(Mumbai Police) दलातील सीआययू पथकानं दोघांना ताब्यात घेतलंय. राजू कांगणे आणि रमेश शिरसाठ अशी या दोघांची नावे आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
दरम्यान मुंबई विविध भागात बॉम्ब ठेवल्याचा एक निनावी फोन आला होता. दादर(Dadar), सीएसएमटी(CSMT), भायखळा स्थानक(Bhaykhala Station) आणि त्याचबरोबर अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांचा बंगला इथं बॉम्ब ठेवल्याचा हा निनावी कॉल होता. या फोनकॉलनंतर या सर्व ठिकाणी बॉम्ब शोधक पथक दाखल झालं आणि त्यांनी संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. ज्या नंबरवरून कॉल आला होता, त्या व्यक्तीनं मला डिस्टरब करू नका, मी फक्त माहिती दिलीय असं सांगत फोन बंद केला होता. त्यानंतर आता या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय.
#mumbaicity #fakebombnewsinmumbai #fakenewsinmumbai #fakenewsmumbai #fakemumbainews #bombnews
Recommended