नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नियमांचे पालन करावे- डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधिक्षक |sakal|
  • 3 years ago
किरकटवाडी: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या पश्चिम हवेलीतील नांदेड, किरकटवाडी व खडकवासला या गावांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत गाव पातळीवर काही दिवस गाव बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ. देशमुख यांनी केले. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत सध्या 378 ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. यातील किरकटवाडी येथे 82, खडकवासला येथे 34 तर नांदेड येथे 101 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत खडकवासला येथे 15, किरकटवाडी येथे 11 तर नांदेड येथे 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.


पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी खडकवासला भाजी मंडई, खडकवासला धरण चौक, किरकटवाडी फाटा, किरकटवाडी ग्रामपंचायत , नांदेड येथील डेस्टिनेशन सेंटर, ग्रामपंचात या ठिकाणांना भेट देत पाहणी केली. नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने व स्थानिक पातळीवर योग्य उपाय योजना दिसत नसल्याने पोलिस अधिक्षक देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिक पोलिस प्रशासनासह, पदाधिकाऱ्यांनीही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना अंमलात आणाव्यात, अशा सूचना देशमुख यांनी केल्या. यावेळी पोलीस उपअधिक्षक राहुल आवारे, हवेली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम आदी उपस्थित होते.


अधिकचा पोलिस बंदोबस्त देणार

मुख्य सिंहगड रस्ता अडवण्यापेक्षा प्रत्येक गावाकडे जाणारे उप रस्ते अडवून त्याठिकाणी चेक पॉईंट लावावेत व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी‌ अशा सूचना पोलीस अधिक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी उपअधीक्षक राहुल आवारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांना केल्या. हवेली पोलिस ठाण्यासाठी अतिरिक्त दहा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी देण्यात येतील, अशी माहितीही देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.

"लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात दिसत आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर गाव पातळीवर काही दिवस पूर्णपणे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा. ज्या घरात रूग्ण आहेत त्या घराच्या बाहेर इतरांच्या माहितीसाठी बोर्ड लावावा. पो
Recommended