भाजप उमरेडच्या वतीने महावितरण कार्यालयाला ताळे ठोकून विजबिलांची होळी | Nagpur | Sakal Media |

  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : महावितरण कंपनीने राज्यातील 75 लक्ष वीज ग्राहकांना वीजबिल थकीत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस पाठवत धमकीवजा सूचना दिली आहे. महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यातील सर्व तालुका स्तरावर महावितरण कंपनीच्या कार्यालयाला ताळेबंद करून हल्ला बोल आंदोलन करण्याचे ठरविले. त्याच पार्श्वभूमीवर आज उमरेड शहरात माजी आमदार सुधीर पारवे तथा डॉक्टर शिरीष मेश्राम राष्ट्रीय परिषद सदस्य भाजपा यांचे नेतृत्वात स्थानिक उपविभागीय अभियंता महावितरण कार्यालयाला ताळे ठोकून वीज बिलांची होळी करण्यात आली. महाविकासआघाडी सरकार मुर्दाबाद, महाविकासआघाडी सरकारचा निषेध अश्या घोषणा देत हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली. (व्हीडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended