११०० किलोमीटरचा सायकलचा यशस्वी प्रवास करीत पर्यावरण संदेश देणारे राजेंद्र भन्साळी | Sakal Media |
  • 3 years ago
शारीरिक दृष्टया मणक्याचा त्रास, गुडघे दुःखी, किडनीस्टोन,बसमध्ये सुद्धा चढता येत नाही अशा अनेक व्याधी असताना सुद्धा राजेंद्र भन्साळी यांनी मनोबल वाढवत अनेक व्याधीनवर मात करत ११०० किलोमीटरचा सायकलचा प्रवास करीत पर्यावरण संदेश देत "भटकंती सह नाती-गोती" जपा असा संदेश देत यशस्वी प्रवास केला. राजेंद्र भन्साळी यांनी 7 जानेवारी ते 14 जानेवारी 2021 असा सात दिवसांत पुणे सिन्नर,नाशिक,भुसावळ, अजंठा औरंगाबाद,अहमदनगर शिरूर ते पुणे असा अकराशे किमीचा सायकलचा प्रवास यशस्वीरित्या करीत पुण्यात आले असता तळजाई टेकडीवर शुक्रवारी सकाळी सात वाजता पुणे रनिंग साऊथ ग्रुपने राजेंद्र भन्साळी यांचा सत्कार केला.यावेळी घेतलेली मुलाखत(व्हिडीओ:अजित घस्ते)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended