संरपंच पदासाठी ४२ लाखाची बोली..ती देखील लिलावातुन..! | Sakal Media |
  • 3 years ago
राज्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायतच्या निवडणूकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे दररोज काहीना काही राजकीय घडामोडी घडत आहे. असेच काही नंदूरबार जिल्ह्यातील एका आदिवासी गावात संरपंच पदासाठी ४२ लाखाची बोली लागल्याने राज्यात या गावाची एकच चर्चा सद्या सुरू आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील खोंडामळी हे पाच हजार नागरी वस्तीचे गाव असून गावातील वाघेश्वरी देवीवर गावकऱ्यांची मोठी श्रध्दा आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत यंदा गावातील खोंडामळी मंदीर उभारणीसाठी जो सर्वात जास्त देणगी देईल त्याची वर्णी संरपंच पदासाठी लागेल असे ठरविण्यात आले. ठरल्यानुसार लिलावाची बोली लागली आणि राज्यात एकच चर्चा सुरू झाली.
सरंपच पदासाठी मंदिराला देणगी देण्यासाठी बोली सुरू झाल्यावर काहींनी साधारण २५ लाख ते ३८ लाखापर्यंत बोली काहींनी लावली. पण सर्वात जास्त प्रदीप वना पाटील यांनी ४२ लाखाची बोली लावणी आणि ही बोली अंतिम ठरली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended