हम किसीको टोकेंगे नही, यदि किसीने टोका तो हम उन्हे छोडेंगे भी नही :चंद्रकांत पाटील | Pune | Sakal |
  • 3 years ago
हम किसीको टोकेंगे नही, यदि किसीने टोका तो हम उन्हे छोडेंगे भी नही", असा इशारा विरोधकांना देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी उपरोधात्मक टीका करत आपल्या भाषणास सुरवात केली.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्र 19 येथे नगरसेविका अर्चना पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
पुढे ते बोलताना म्हणाले की, पुण्यात कोथरुड, कसबा अशा भागात काम करणे सोपे असते. मात्र, ज्या भागात आपल्या कामाला अनुकूलता नाही, विरोध आहे, अशा ठिकाणी कामे करणे हे आव्हाण असते, ते आव्हाण नगरसेविका अर्चना पाटील यांनी पेलले आणि भवानी पेठेच्या परिसरात विकासकामे केली असे गौरवौद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended