अजिंठा लेणीत नऊ महिन्यानंतर पर्यटकांना प्रवेश सुरू.| Aurangabad | Maharashtra | Sakal Media |

  • 3 years ago
औरंगाबाद : कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत उद्या 10 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. तरीही कोविड 19 अनुषंगाने सर्व सूचनांचे पालन व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि पर्यटकांनी करावे, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच अजिंठा लेणी पाहण्यास जगभरातील पर्यटकांनी अजिंठ्यात येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended