भारत बंदला अमरावती जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद | Amravati | Farmer Protest | Maharashtra |Sakal Media
  • 3 years ago
अमरावती : केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी राजधानी दिल्ली येथे ठिय्या दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंददरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. शिवाय रस्त्यानेही ये-जा करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने काही प्रमाणात सुरू होती. आंदोलनकर्त्यांनी दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. या भारत बंदमध्ये किसान संघर्ष समितीसह काँग्रेस, आप, भाकप, माकप, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी सहभाग घेतला. (व्हिडिओ - राजू तंतरपाडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended