दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन | Pune | Maharashtra | Sakal Media
  • 3 years ago
पुणे, ता. 3 : शेतकरीविरोधी कॉर्पोरेट धार्जिणे कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील मंडईत गुरुवारी शेतकरी आणि कामगार संघटनांनी मानवी साखळी तयार करीत निदर्शने केली.
या आंदोलनात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनाची संघर्ष समिती, स्त्री मुक्‍ती आंदोलन संपर्क समिती, कामगार संघटना संयुक्‍त कृती समिती यासह हमाल पंचायतीचे बाबा आढाव, "सीटू'चे अजय अभ्यंकर, "इंटक'चे कैलास कदम, जनवादी महिला संघटनेच्या किरण मोघे, सुनिता सु.र., एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सुभाष वारे, कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या पोर्णिमा चिकारमाने, नव समाजवादी पर्याय संघटनेचे बी. युवराज, पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या सरस्वती भांदर्गे, डॉ. ज्ञानेश्वर मोठे तसेच इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended