गुमगावच्या अर्धवट पुलाचे काम कधी पूर्ण होणार? | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media
  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : गुमगाव आणि इतर गावांना जोडणारा वेणा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम कित्येक दिवसांपासून थंडबस्त्यात आहे. कित्येक दिवसांपासून अर्धवट आणि बंद अवस्थेत असलेल्या पुलाच्या बांधकामाकडे दुर्लक्ष होत असल्याने अर्धवट पुलाचे काम कधी पूर्ण होणार? याबाबत आता नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना विचारणा होत आहे. तीन पावसाळे निघून गेल्यानंतरही पूल अपूर्ण असल्याने परिसरातील वाहनधारकांना हिंगणा, नागपूर आणि बुटीबोरीकडे जाण्यासाठी धानोली, कोतेवाडा, सालईदाभा आणि अमरावती-जबलपूर महामार्गासारख्या पर्यायी परंतु दूरच्या मार्गांवरून निष्कारण प्रवास करावा लागत आहे.
(व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended