आंबोलीत पावसाचा मुड बदलतोय | Sakal Media |
  • 3 years ago
आंबोली (सिंधुदुर्ग) - आंबोलीचा पाऊस वेगळीच शान घेवून दरवर्षी बरसतो; पण वातावरणातील बदलाचा प्रभाव इथल्या पावसावरही दिसू लागला आहे. गेल्यावर्षी तर विक्रमी पाऊस झाला. यंदाही आतापर्यंत पावसाने सरासरी पार केली आहे. 300च्या सरासरासरीने ऑक्‍टोबर पर्यंत बरसणारा पाऊस आताच 380 इंचावर पोहोचला आहे. येथे पाऊस मोजण्याचे काम पर्जन्यमापक भाऊ ओगले यांच्या तीन पिढ्या करत आहेत. त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर येथेही पावसाचे वेळापत्रक मागेपुढे होत असल्याचे लक्षात आले. पूर्वी येथे कोसळणाऱ्या पावसात बऱ्यापैकी एकसुरीपणा असायचा. आता मात्र पाऊस कमी जास्त होत असला तरी त्याच्या बरसण्याच्या पद्धतीत साधर्म्य नाही. एखाद्यावर्षी ठरावीक वेळेलाच मुसळधार तर काहीवेळा हंगामभर सलग पाऊस पडतो.
Recommended