दूधाने रस्‍ता झाला पांढरा

  • 3 years ago
निजामपूर-जैताणे (धुळे) : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला हमीभाव मिळावा; यासाठी साक्री तालुक्याच्या माळमाथा परिसरातील निजामपूर- जैताणे येथे भाजपतर्फे दूध-आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी शासन विरोधी निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आले. भाजपचे इंजि. मोहन सूर्यवंशी व जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. (व्हिडिओ : भगवान जगदाळे)