नागपूरकर म्हणाले, 'लॉकडाउन नकोच, आम्ही नियम पाळू' आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |
  • 3 years ago
नागपूरकर म्हणाले, 'लॉकडाउन नकोच, आम्ही नियम पाळू'
नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात लॉकडाउनचा इशारा दिल्यामुळे नागपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने घरांमध्येच राहणे पसंत करीत "जनता कर्फ्यू'ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकप्रकारे नागपूरकरांनी "लॉकडाउन नकोच, आम्ही नियम पाळू', असाच संदेश आयुक्तांना दिला. विशेष म्हणजे दुकानदारांनीही शटर "डाऊन' करून महापौर संदीप जोशी, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. "जनता कर्फ्यू'मुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद होत्या तर अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांचीच वाहने धावल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended