शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची शेतात आई- वडिलांना मदत

  • 3 years ago
अहमदनगर : कोरोनामुळे शाळा बंद आहेत. पाऊस सुरु असल्याने शेतकरी कामात व्यग्र आहेत. सरकारने खावटी बंद केली. हिरडा खरेदी केला नाही. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. व्याजाने पैसे घेऊन त्याने बियाणे खते घेतली आहे. मजूरीसाठी पैसे नाहीत. त्याचीही अवस्था पाहून शाळेतून घरी बसलेले विद्यार्थी आपल्या आई- वडिलांना मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. गुढघाभर गाळात उतरून भाताची अवनी करताना तर कधी औत हाकताना व गुरे वळताना शाळकरी मुले ठिकठिकाणी दिसत आहे. नको आम्हाला शाळा आमची शेतीशाळा बरी... अकोले तालुक्यात पाऊस सुरु असून शेतकरी आवणी उरकण्याचा मागे आहे. आश्रमशाळा, माध्यमिक, जिल्हापरिषद शाळा कोरोनामुळे बंद आहे.
#sakalmedia #viral #marathinews #trending #sakalnews #nagarnews #corona

Recommended