कुठला जनता कर्फ्यु, माहित नाही आम्हाला.. | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
कुठला जनता कर्फ्यु, माहित नाही आम्हाला..
महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी शनिवारी रात्री उशिरा आठवड्यातून दोन दिवस रविवार व गुरुवार जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. मात्र आज व्यापाऱ्यांना या कर्फ्युचे कुठलेही पत्रक किंवा सूचना मिळाली नसल्याने अक्षरश: या कर्फ्युचा फज्जा उडाल्याचे चित्र शहरात पहायला मिळाले. पिंपरी कॅम्प मार्केटमध्ये प्रामुख्याने कपडे, किराणामाल, भाजी पाला यांची ८० टक्के दुकाने उघडलेली दिसत होती. शगुन चौकातील सगळी दुकाने सम विषम तारखे नुसार सुरु असल्याने नागरिकदेखील खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली होती. कोरोनाचा वाढता आलेख पाहता महापौर व आयुक्तांनी केलेल्या आवाहनास काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र शहरात रविवारी दिसत होते. व्यापारी व नागरिक या जनता कर्फ्युबद्दल काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडिओ. (संतोष हांडे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended